जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिक मध्ये पुन्हा एकदा कांद्याचे भाव कोसळले आहेत ज्याचा फटका कांदा उत्पादकांना होऊ शकतो. या पार्श्वभूमिवर उपाययोजना करण्याऐवजी कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सर्व खापर ग्राहकांवरतीच फोडले आहे. महिलांच्या लिपस्टिकला उद्देशून त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
”गृहिणी 500 रुपयांचे लिपस्टिक खरेदी करतात मात्र, चढ्या दराने कांदे खरेदी करत नाहीत, जनतेची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत, कांद्याला अच्छे दिन येणार नाही’’.अशा प्रकारचे धक्कादायक वक्तव्य पाशा पटेल यांनी केले आहे.
महिला या 500 रुपयांचे लिपस्टिक खरेदी करतील पण 20- 25 दराने मिळणारे कांदे त्यांना जास्त भाव असल्यासारखे वाटतात. असं म्हणत पाशा पटेल यांनी थेट नागरिकांनाच दोषी ठरविले आहे.