‘भारत जोडो यात्रेत सहभागी होणं हे कर्तव्य’

शिवसेना खासदार संजय राऊत हे येत्या २० जानेवारी रोजी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. कन्याकुमारीपासून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. मधल्या काळात ही यात्रा महाराष्ट्रात येऊन गेली, मात्र संजय राऊत त्यात सहभागी झाले नाहीत. येत्या २० जानेवारी रोजी यात्रेच्या अंतिम टप्प्यात जम्मू काश्मीरमध्ये संजय राऊत यात्रेत सहभागी होणार आहेत. […]

‘भारत जोडो यात्रेत सहभागी होणं हे कर्तव्य’

शिवसेना खासदार संजय राऊत हे येत्या २० जानेवारी रोजी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. कन्याकुमारीपासून निघालेली राहुल गांधी यांची यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. मधल्या काळात ही यात्रा महाराष्ट्रात येऊन गेली, मात्र संजय राऊत त्यात सहभागी झाले नाहीत. येत्या २० जानेवारी रोजी यात्रेच्या अंतिम टप्प्यात जम्मू काश्मीरमध्ये संजय राऊत यात्रेत सहभागी होणार आहेत.

संजय राऊत म्हणाले, यात्रेचा शेवटचा टप्पा जम्मू काश्मीरमध्ये आहे. हा या देशासाठी अत्यंत संवेदनशील असा भूभाग आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं त्या भूमीशी भावनिक नातं आहे. त्या नात्यानं मी जम्मू काश्मीरच्या भूमीवर शिवसेनेतर्फे उपस्थित राहील आणि यात्रेत सहभागी होईल. ही तारीख २० जानेवारी असेल.

राहुल गांधी यांच्या यात्रेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं पाहिजे, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ संपूर्ण देश राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी झाला आहे. ४ हजार किलोमीटर प्रवास केला आहे. त्याचं कौतुक पंतप्रधानांनी करायला हवं. देशातला एक तरुण काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हजारो लोकांना सोबत घेऊन देशाच्या एकतेसाठी, सूड भावना नष्ट करण्यासाठी चालतोय.

महाराष्ट्रातील हिंगोली, वाशिम, अमरावती, बुलढाणा आदी ठिकाणी राहुल गांधींच्या सभा झाल्या. संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात त्या वेळी नुकताच जामीन मिळाला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते महाराष्ट्रातील यात्रेत सहभागी झाले नव्हते. मात्र आता भारत जोडो यात्रेच्या अखेरच्या टप्प्यात संजय राऊत जम्मू काश्मीर येथे राहुल गांधींसोबत पायी चालतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number