मुंबई, १६ मे २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची प्रेमकहाणी सध्या बरीच चर्चेत आहे. नुकताच यांचा साखरपुडा पार पडलात्यानंतर आता हे दोघे लग्न कधी करणार या कडे सगळ्यांच्या नजरा आहेत.अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली नसली तरी परिणीतीने याबाबत एक इशारा दिला आहे. परिणीतीची बहीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने परिणीतीच्या साखरपुड्याचे काही फोटो पोस्ट केले होते. या पोस्टवर कॉमेंट करत परिणीतीने लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली. तर सूत्रांच्या माहितीनुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात राघव आणि परिणीती लग्न करणार असलायची शक्यता वर्तवली जात आहे.