राज्यात एकीकडे विद्यार्थ्यांचे शाळेत विविध पद्धतीने स्वागत होत आहे. तर, दुसरीकडे नाशिकच्या भोसला शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पहिल्याच दिवशी करावे लागले आहे. विद्यार्थ्यांना मोडकळीस आलेली इमारत दिल्याने पालक विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांच्या फीमध्ये इमारत शुल्क घेऊनही विद्यार्थ्यांना चांगली इमारत न दिल्याने पालक संतप्त झाले होते. शाळा प्रशासनाने दिलेली इमारत विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असल्याने दुसरी इमारत देण्याची पालकांनी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकांनी आंदोलन केले. तर, भोसला शाळेच्या शिशू विहार शाळेत आंदोलन करण्यात आले.