बसण्याच्या जागेवरुन महिलेला मारहाण, परभणीतील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरुन महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना परभणीत घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 21 तारखेला संध्याकाळी सात ते आठ दरम्यान सेलू स्थानकावर गाडी पोहोचली असता हा प्रकार घडलाय. यातून प्रवास करणारे एक कुटुंब आणि तीन तरुणांमध्ये बसण्याच्या जागेवरुन वाद सुरु झाला. तिघांपैकी एका तरुणाने कुटुंबातील […]

बसण्याच्या जागेवरुन महिलेला मारहाण, परभणीतील धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, परभणी

रेल्वेमध्ये बसण्याच्या जागेवरुन महिलेला बेदम मारहाण केल्याची घटना परभणीत घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 21 तारखेला संध्याकाळी सात ते आठ दरम्यान सेलू स्थानकावर गाडी पोहोचली असता हा प्रकार घडलाय. यातून प्रवास करणारे एक कुटुंब आणि तीन तरुणांमध्ये बसण्याच्या जागेवरुन वाद सुरु झाला. तिघांपैकी एका तरुणाने कुटुंबातील महिलेला खाली पाडून लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली.

यावेळी बोगीत सर्व प्रवाशांसमोर हा प्रकार सुरु होता. पण कोणीही त्याला रोखण्यासाठी पुढे आले नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. याउलट एका प्रवाशाने मारहाणीची घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत केली आणि हा व्हिडीओ व्हायरल केला. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी औरंगाबादमधील रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number