Amravati Crime News : लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट, अयान-उझेरमध्ये मुली पटवण्यावरून शर्यत, पण अखेर….

परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात आरोपींच्या आपापसातील वादातून संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

Amravati Crime News : लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट, अयान-उझेरमध्ये मुली पटवण्यावरून शर्यत, पण अखेर….

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे घडलेल्या तरुणींच्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणात आता एक धक्कादायक इनसाईड स्टोरी समोर आली असून, संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला याचा धागा आरोपींच्या आपापसातील वादातून मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचा साथीदार उझेर खान यांच्यात एकप्रकारची स्पर्धा सुरू होती. अधिकाधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढणे आणि त्यांना मोहात पाडणे, यासाठी दोघांमध्ये चढाओढ लागली होती. या विकृत मानसिकतेतून दोघांनी अनेक तरुणींना फसवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

अयान अहमद हा तरुणींशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडिओ तयार करत होता. हे व्हिडिओ तो आपल्या मित्र उझेर खानला पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकारामध्ये दोघेही एकमेकांना प्रोत्साहन देत असल्याचेही तपासात दिसून आले आहे.मात्र, काही दिवसांनी या दोघांमध्ये पैशांच्या कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद इतका वाढला की, रागाच्या भरात उझेर खानने अयानकडे असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरुवात केली. यामुळेच या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.

या व्हिडिओंच्या माध्यमातून अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून, अनेक तरुणींच्या शोषणाचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपींविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. या घटनेमुळे समाजात संताप व्यक्त होत असून, अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number