परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला झाला आहे. गुरुवार ११ मेपासून परशुराम घाट २४ तास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. २५ एप्रिल २०२३पासून परशुराम घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी या घाटावरील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे या दिवसांत […]

परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला झाला आहे. गुरुवार ११ मेपासून परशुराम घाट २४ तास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. २५ एप्रिल २०२३पासून परशुराम घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी या घाटावरील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे या दिवसांत दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, या बंद कालावधीत हलक्या वाहनांची पर्यायी वाहतूक कळंबस्ते- आंबडस-चीरणी मार्गे वळवण्यात आली होती. या कालावधीत वाहतुकीवर मोठा प्रमाणात फटका बसला.

परशुराम घाटाचे ४० टक्के काम पूर्ण

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाचं चौपदरीकरणांचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे. तर मागील १५ दिवस या घाटावरील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, या दिवसात परशुराम घाटाच्या चौपदरीकरणाचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या घाटात प्रवास करताना प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number