परमबीर सिंग अखेर निलंबित

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्या फाईलवर स्वाक्षरी केल्यामुळे त्यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट होत आहे. न्यायालयाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर परमबीर सिंह हे चौकशीसाठी आयोगापुढे हजर झाले. यावेळी त्यांनी शासकीय वाहनाचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याकडून हे वाहन काढून […]

परमबीर सिंग अखेर निलंबित

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर आज निलंबनाची कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्या फाईलवर स्वाक्षरी केल्यामुळे त्यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट होत आहे.

न्यायालयाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केल्यानंतर परमबीर सिंह हे चौकशीसाठी आयोगापुढे हजर झाले. यावेळी त्यांनी शासकीय वाहनाचा वापर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याकडून हे वाहन काढून घेण्याची कारवाईदेखील राज्य सरकारने केली आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यामुळे त्यांच्या निलंबनावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट होत आहे. देबाशिष चक्रवर्ती समितीच्या अहवालात परमबीर यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच ते सेवेतही रुजू न झाल्याचाही त्यांच्यावर ठपका आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number