फरार घोषित परमबीर सिंह चंदिगडमध्ये

  खंडणीप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच येत्या ३० दिवसांच्या आत त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. मात्र आता फरार घोषित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.   न्यायालायने आदेश दिल्यास चौकशीला हजर राहणार […]

फरार घोषित परमबीर सिंह चंदिगडमध्ये

  खंडणीप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे. तसेच येत्या ३० दिवसांच्या आत त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहेत. मात्र आता फरार घोषित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे.

  न्यायालायने आदेश दिल्यास चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती परमबीर सिंह यांनी दिली आहे. परमबीर सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. लवकरच परमबीर सिंह मुंबईतील त्यांच्याशी संबंधित प्रकरणांच्या तपासात सहभागी होणार आहेत.

  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याचे आदेश दिले असल्याबाबतचे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्याप्रकरणी चौकशीसाठी चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली. चांदीवाल आयोगाने यापूर्वीही परमबीर सिंग यांना हजर राहण्यासाठी अजामीनपात्र वॉरंट जारी केला. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांसमोर हजर न राहिलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number