पंकजा मुंडेंच्याच बीडमध्ये मुली असुरक्षित; ताई, तुम्ही तरी या मुलींना न्याय द्या!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंच्याच बीडमध्ये मुली असुरक्षित आहेत. मुलींना छेडणारा नराधम मोकाट फिरतोय, तर मुली मात्र दहशतीखाली वावरत आहेत.   एवढंच नाही मुलींसह त्यांच्या नातेवाईकांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. हा नराधम भाजपचा कार्यकर्ता आहे.   राणा डोईफोडे या नराधमापासून वाचवा अशी याचना करत पीडित मुलींनी […]

पंकजा मुंडेंच्याच बीडमध्ये मुली असुरक्षित; ताई, तुम्ही तरी या मुलींना न्याय द्या!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडेंच्याच बीडमध्ये मुली असुरक्षित आहेत. मुलींना छेडणारा नराधम मोकाट फिरतोय, तर मुली मात्र दहशतीखाली वावरत आहेत.

 

एवढंच नाही मुलींसह त्यांच्या नातेवाईकांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. हा नराधम भाजपचा कार्यकर्ता आहे.

 

राणा डोईफोडे या नराधमापासून वाचवा अशी याचना करत पीडित मुलींनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. लैंगिक छळ करणाऱ्या राणा डोईफोडेवर पोलिसांचा तसेच

राजकीय वरदहस्त असल्यानेच त्याला लगेच जामिन मंजूर झाल्याचा आरोप या मुलींनी केला.

 

या राणा डोईफोडेपासून आमचं रक्षण करा अशी मागणी या मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number