जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांचे संपावर जाणं दुर्दैवीच असून सरकार कर्जमाफीबद्दल सकारात्मक विचार करत असल्याचं महीला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
सरकार सकारात्मक होऊन कर्जमाफी करत आहे. हा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल.
मुख्यमंत्री आमचे लीडर आहेत त्यामुळे ते एकाकी पडले नाहीत असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.
ज्यावेळी असे प्रश्न येतात त्यावेळी मुंडे साहेबांची आठवण येते. मुंडे साहेब जरी असते तरी त्यांनी हेच केलं असते.
शेतकरी संपावर जाणं हेच दुर्दैवी आहे. मात्र, सरकारही सकारात्मक आहे लवकरच तोडगा निघेल असेही त्या म्हणाल्या.