जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुख्यमंत्री फडणवीस यांचा अपवाद सोडता सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शतप्रतिशत उपस्थित राहिले नाहीत. तसेच कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर दांडी मारण्यात
अव्वल आहेत अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुख्य सचिव कार्यालयानं दिली.
पांडुरंग फुंडकर, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, संभाजी निलंगेकर-पाटील आणि राजकुमार बडोले यांचा क्रमांक टॉप 5 दांडी बहादुर मंत्र्यांमध्ये
लागतोय.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्य सचिव कार्यालयाकडे मंत्रिमंडळाच्या बैठकी आणि मंत्र्याची उपस्थितीची माहिती मागितली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता 22 च्या 22 मंत्र्यानी दांडी मारली. या दांडी बहादुरीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अव्वल क्रमांक पटवित 35 पैकी
11 वेळा अनुपस्थित होते.