जय महाराष्ट्र न्यूज, बीड
बीडमध्ये सुकाणू समितीच्या आंदोलनामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहण सोहळ्याला अनुपस्थित राहील्याने सयाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्य़ात
आले.
सरसकट कर्जमाफीसाठी सुकाणु समितीने राज्यभर आंदोलन छेडले. संपूर्ण कर्जमाफी न दिल्याने पालक मंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही असा पवित्रा सुकाणू समितीने
घेतला आणि राज्यभरात अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.
बीडसह अनेक ठिकाणी पोलिसांनी सुकाणू समितीच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं.