जय महाराष्ट्र न्यूज, बीड
सबका साथ सबका विकास हा नारा देत महाराष्ट्रात 3 वर्षा पूर्वी भाजप सरकार सत्तेवर आलं. मात्र गेल्या 3 वर्षात गाव खेड्यात, वाड्या वस्तीत,तांडयावर “अच्छे दिन” आले का? हा खरा प्रश्न आजही आ वासून उभा आहे.
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या बीड जिल्ह्यातील मानकुरवाडीत पक्के रस्ते नाहीत. मुलभूत सुविधा गावापर्यत पोहचलेल्या नाहीत.
मुख्य रस्त्यापासून गावाला जोडणारा 7 किमीचा चांगला रस्ता नाही. दोन महिन्यापूर्वी रस्ता नसल्यानं गावच्या सरपंचाला उपचाराअभावी जीव गमवावा लागलाय.