पंकजा मुंडे समर्थकांनी दरेकरांचा ताफा अडवला

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सहा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, भाजप नेते पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मुंडे समर्थकांनी केला. बीड-उस्मानाबाद सीमेवर मुंडे समर्थकांनी दरेकरांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी दरेकरांच्या विरोधात जोरदार […]

पंकजा मुंडे समर्थकांनी दरेकरांचा ताफा अडवला

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सहा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, भाजप नेते पंकजा मुंडे यांना विधानसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मुंडे समर्थकांनी केला. बीड-उस्मानाबाद सीमेवर मुंडे समर्थकांनी दरेकरांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी दरेकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, पंकजा मुंडे यांची उमेदवारी डावलण्यात आली. त्यामुळे मुंडे समर्थक नाराज आहेत. त्यामुळे प्रवीण दरेकर बीड दौऱ्यावर असताना बीड-उस्मानाबाद सीमेवर त्यांचा ताफा मुंडे समर्थकांकडून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून पाच जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय उमा खापरे, यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रयतक्रांती मोर्चाचे नेते सदाभाऊ खोत अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचा पाठिंबा असलेले खोत हे अपक्ष उमेदवार म्हणून विधानपरिषद निवडणुक लढवणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number