पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत

मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी :  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रासप अध्यक्ष महादेव जानकर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर […]

पंकजा मुंडे पुन्हा एकदा चर्चेत

मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी :  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने दिल्लीत आज राष्ट्रीय समाज पक्षाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रासप अध्यक्ष महादेव जानकर, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. विशेष म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ‘पंकजाताईंच्या पक्षामुळं समाजाचं हित नाही’ असं वक्तव्य केलं. त्यावर पंकजा मुंडे यांनीदेखील प्रत्युत्तर दिलं.

यावेळी महादेव जानकरांना उद्देशून पंकजा मुंडे म्हणाल्या, “तुम्ही म्हणताय ताईची पार्टी ताईची पार्टी. माझी कुठली पार्टी? मी भाजपची आहे, पण भाजपा माझी थोडीच आहे. भाजप खूप मोठा पक्ष आहे. मी भाजपची होऊ शकते. पक्ष माझा होऊ शकत नाही. कारण तो मोठा पक्ष आहे”, असं धक्कादायक विधान मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही. भीती न वाटणं हे आमच्या रक्तातच आहे. कशाची चिंता नाही. काही नाही मिळालं तर मी ऊस तोडायला जाईन. महादेव जानकर जातील मेंढ्या चरायला, आणखी काय होईल? आम्हाला काही गमवायचंच नाही. आम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीची लालसा, आस्था, अपेक्षा नाहीच”, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमात जानकर यांच्याशी असलेल्या भावा-बहिणीच्या नात्यावर भाष्य करताना त्यांच्या अविवाहितपणावर मिश्किल टिप्पणी केली. त्या म्हणाल्या “महादेव जानकरांनी तर लग्नच केलेलं नाही. खूप चांगलं काम केलं त्यांनी. मी तर म्हणेन यामुळे ते नशीबवान आहेत. यामुळे ते समाजासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम करू शकतात. आमचाही नेता चहा विकता विकता बनला की प्रधानमंत्री. माझंही लक्ष राष्ट्रीय समाज पक्षावर आहे. हा पक्ष माझ्या भावाचा आहे. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष हे माझं माहेर आहे. वडिलांशी लढाई झाली तर भावाच्या घरात जाईन”, असं देखील सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number