जय महाराष्ट्र न्यूज, बीड
महिला आणि बालविकासमत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेवर नाव न घेता पुन्हा एकदा टीका केली. गोपीनाथ मुंडे यांचे देशातील आणि राज्यातील विरोधक आता मला संपावायला निघालेत यासाठी त्यांनी आपलंच सैन्य सोबत घेतलं आहे.
आता आम्ही दोघंही एकाच गुरुचे शिष्य त्यामुळे लढणं कठीण आहे. मात्र हे धर्मयुद्ध मला लढवावं लागेल असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. तर, सोशल मिडीवरही त्यांनी टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या कोणा एका जातीची मालकी नाही. मात्र, सोशल मीडियावरून तो मालकी हक्क दाखवला जात आहे. ही प्रवृत्ती संपवण्याची आता वेळ आली असल्याचं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. पिंपरी चिंचवड मध्ये एका गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.