बोँडअळीग्रस्त, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत; पांडुरंग फुंडकरांची विधानसभेत घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत मदत जाहीर केली आहे.   भात उत्पादक शेतकऱ्यांना 33 टक्केपेक्षा जास्त नुकसानासाठी प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये ते 23 हजार 250 रुपये इतकी मदत मिळणार आहे. तर बोंडअळीग्रस्त […]

बोँडअळीग्रस्त, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत; पांडुरंग फुंडकरांची विधानसभेत घोषणा

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

राज्यात बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकरी आणि ओखी वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानसभेत मदत जाहीर केली आहे.

 

भात उत्पादक शेतकऱ्यांना 33 टक्केपेक्षा जास्त नुकसानासाठी प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये ते 23 हजार 250 रुपये इतकी मदत मिळणार आहे. तर बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये ते 37 हजार 500 रुपये इतकी मदत मिळणार. अशी माहिती पांडुरंग फुंडकर यांनी दिलीय.

 

ओखी वादळानं नुकसान झालेल्या फळ पिकांच्या नुकसानीबाबतही मदत जाहीर करण्यात आलीय. पिकांसाठी एनडीआरएफमार्फत 18 हजार तर विमा हवामान घटकाच्या जोखमीनुसार पीक विम्याअंतर्गत 9 हजार ते 25 हजार रुपये इतकी मदत दिली जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number