…म्हणून पंढरपूरात खड्ड्यातच केली सत्यनारायणाची पूजा

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर   नागरिकांसाठी रस्त्यातील खड्यांची समस्या ही रोजचीच झालेली आहे. रस्त्यावरील खड्ड्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिक आणि सामाजिक संघटनांनी चक्क पंढरपूरमध्ये खड्ड्यात सत्यनारायणाची पूजा घातली आहे. पंढरपूरात सर्वच रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहेत. वारंवार तक्रार करुनही प्रशासन हे खड्डे दुरुस्ती करत नाही. अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले, तरीही प्रशासनाला जाग येत […]

…म्हणून पंढरपूरात खड्ड्यातच केली सत्यनारायणाची पूजा

जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर

 

नागरिकांसाठी रस्त्यातील खड्यांची समस्या ही रोजचीच झालेली आहे. रस्त्यावरील खड्ड्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिक आणि सामाजिक संघटनांनी चक्क पंढरपूरमध्ये खड्ड्यात सत्यनारायणाची पूजा घातली आहे.

पंढरपूरात सर्वच रस्त्यात खड्डेच खड्डे पडले आहेत. वारंवार तक्रार करुनही प्रशासन हे खड्डे दुरुस्ती करत नाही. अनेक अपघात होऊन नागरिक जखमी झाले, तरीही प्रशासनाला जाग येत नाही.

मंगळवारी पंढरपूरमध्ये नागरिक आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत पंढरपूर पुणे रस्त्यावरील सरगम चौक रेल्वेपुलाखाली धार्मिक पध्दतीने सत्यनारायणाची पुजा घातली.

या अनोख्या आंदोलनामुळे तरी प्रशासनाला जागे होऊन खड्डे बुजवेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number