जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर
आजपर्यंत आपण अनेक लग्नसोहळे पाहिले. लग्न सोहळ्यात वारेमाप पैशांची उधळण केली जाते. मात्र, समाजासाठी आदर्श घालून देणारे लग्नसोहळे क्वचित असतात. तसाच एक आदर्श लग्नसोहळा पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यात पार पडला.
माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडीच्या नवनाथ बांदल यांच्या मुलीचं काही दिवसापूर्वी लग्नं झालं. मुलीच्या लग्नात वारेमाप खर्च टाळत त्यांनी गावातील शाळेत शिकणाऱ्या मुलींना सायकल भेट दिल्या.
कारण तांदळवाडी गावापासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 3 किलोमीटर दूर आहे. विद्यार्थींनीना शाळा गाठायची असेल तर 3 किलोमीटरचे हे अंतर पायी जावे लागते.
म्हणून त्यांनी आपल्या लेकीप्रमाणे इतर लेकींचा विचार करत हा निर्णय घेतला. त्यांचा हा आदर्श इतरांनी घेतला तर नक्कीच मुलींच्या शिक्षणास मदत होईल. तेव्हाच पढेगा इंडिया तभी तो बढेगा इंडिया संकल्पना पूर्ण होईल.