Pandharichi Wari:मोठी बातमी! वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिंड्यांना सरकारकडून 2.80 कोटींचा निधी मंजूर

शासनाने या योजनेसाठी एकूण 2.80 कोटींचा निधी मंजूर केला असून त्याबाबतचा अधिकृत शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे.

Pandharichi Wari:मोठी बातमी!  वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; दिंड्यांना सरकारकडून 2.80 कोटींचा निधी मंजूर

आषाढी एकादशीच्या पवित्र वारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने वारकरी संप्रदायासाठी मोठा निर्णय घेतला असून राज्यातील मानाच्या 1,400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000  रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या अनेक दिंड्यांना आर्थिक मदत मिळणार असून त्यांच्यावर येणारा प्रवास, निवास, अन्न व इतर व्यवस्थेचा काहीसा भार हलका होणार आहे. शासनाने या योजनेसाठी एकूण 2.80 कोटींचा निधी मंजूर केला असून त्याबाबतचा अधिकृत शासन आदेश देखील जारी करण्यात आला आहे.

या अनुदान वितरणाची जबाबदारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे सोपवण्यात आली आहे. तसेच हे अनुदान मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत संबंधित दिंड्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. संपूर्ण प्रक्रियेचे समन्वय व प्रशासकीय नियंत्रण पुणे विभागीय आयुक्तांकडे असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 शासनाच्या या निर्णयामुळे वारीच्या व्यवस्थापनाला अधिक बळ मिळेल, तसेच परंपरागत वारकरी दिंड्यांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासात आर्थिक आधार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो.  लाखो भाविक दरवर्षी पायी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात आणि या प्रवासात विविध दिंड्या शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होतात. अशा पार्श्वभूमीवर शासनाचा हा निर्णय वारकऱ्यांच्या सोयीसुविधा वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत दिंड्यांच्या व्यवस्थापनात अधिक सुसूत्रता आणि दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

यंदा 25 जुलै रोजी आषाढी एकादशी असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होत आहेत. त्यासाठी, पायी वारीली सुरुवात झाली आहे. लवकरच देहू येथून श्री संत तुकाराम महाराज आणि आळंदीतून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल. त्याच पार्श्वभूमीवर शासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number