PAN अर्जात मोठा बदल! चुकीचा फॉर्म भरल्यास अर्ज थेट रिजेक्ट होणार; 4 नवे फॉर्म लागू

पॅन कार्ड अर्ज प्रक्रियेत मोठे बदल झाले असून 49A ऐवजी आता 93 94 95 आणि 96 हे चार नवीन फॉर्म लागू झाले आहेत. योग्य फॉर्म निवडणे महत्त्वाचे असून चुकीचा अर्ज केल्यास तो नाकारला जाऊ शकतो.

PAN अर्जात मोठा बदल! चुकीचा फॉर्म भरल्यास अर्ज थेट रिजेक्ट होणार; 4 नवे फॉर्म लागू

Pan card new rules: पॅन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत केंद्र सरकारने मोठा बदल करत अर्ज पद्धती अधिक सुलभ आणि स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक वर्ष 2026-27 पासून जुन्या फॉर्म 49A आणि 49AA ऐवजी आता चार नवीन फॉर्म लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करताना योग्य फॉर्म निवडणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

आतापर्यंत भारतीय नागरिक आणि परदेशी नागरिकांसाठी स्वतंत्र फॉर्म होते. मात्र आता अर्जदारांच्या प्रकारानुसार प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी फॉर्म 93, 94, 95 आणि 96 असे चार वेगवेगळे पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक श्रेणीतील अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार फॉर्म भरता येणार आहे.

नवीन नियमांनुसार, फॉर्म 93 हा भारतातील वैयक्तिक नागरिकांसाठी आहे. फॉर्म 94 हा भारतात नोंदणीकृत कंपन्या किंवा संस्थांसाठी लागू होईल. परदेशी नागरिकांसाठी फॉर्म 95 ठेवण्यात आला आहे, तर भारताबाहेरील कंपन्या किंवा संस्थांसाठी फॉर्म 96 वापरावा लागेल. त्यामुळे अर्ज करताना आपली श्रेणी ओळखून योग्य फॉर्म निवडणे आवश्यक आहे, अन्यथा अर्ज नाकारला जाऊ शकतो.

हेही वाचा: Microsoft Warning: सावधान! मायक्रोसॉफ्ट कोपायलट वापरताय? कंपनीने हात झटकले; चुकीच्या माहितीसाठी आता…

या बदलांमुळे अर्ज प्रक्रिया अधिक स्पष्ट झाली असली, तरी काही नवीन नियमही लागू करण्यात आले आहेत. आता अर्जामध्ये पूर्ण नाव देणे आवश्यक आहे आणि केवळ आद्याक्षरे वापरण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तसेच आईचे नाव देणे अनिवार्य करण्यात आले आहे, जे आधी ऐच्छिक होते.

याशिवाय, अर्जदाराचा निवासी दर्जा म्हणजेच निवासी, अनिवासी किंवा सामान्य रहिवासी नसलेली व्यक्ती याची माहिती देणे आवश्यक आहे. अनिवासी अर्जदारांसाठी पासपोर्ट आणि टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन प्रणालीमध्ये अर्जदारांना पॅन कार्ड कोणत्या पत्त्यावर मिळवायचे आहे, याचा पर्यायही देण्यात आला आहे. म्हणजेच, घरच्या पत्त्यासोबत कार्यालयाच्या पत्त्यावरही कार्ड मिळवण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच प्रतिनिधीमार्फत अर्ज करत असल्यास त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती देणे आवश्यक ठरणार आहे.

हेही वाचा:WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! आता नंबर न देता करा चॅट; ‘युजरनेम’ फिचर लवकरच होणार लाँच

सरकारच्या या निर्णयामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि वापरकर्त्यासाठी सोयीची होईल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र चुकीचा फॉर्म भरल्यास अर्ज रद्द होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजीपूर्वक अर्ज करणे गरजेचे आहे.

पॅन कार्डसाठीच्या या नव्या बदलांमुळे अर्जदारांना अधिक स्पष्टता मिळणार आहे. मात्र योग्य माहिती आणि कागदपत्रांसह अर्ज केल्यासच प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व नियम नीट समजून घेणे आवश्यक ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number