जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली.
आधार कार्ड नसल्यास पॅन कार्ड वापरून इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. तसेच घटनापीठाचा निकाल येईपर्यंत आधार-पॅन जोडणीवरील स्थगिती कायम
राहणार आहे.
कायद्यानुसार इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आधार देणं सक्तीचं करण्यात आले. त्यासाठीच, आधार आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करण्याची मोहीमही सुरू
करण्यात आली.
मात्र, सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. आधार कार्ड ऐच्छिक असल्याची भूमिका घेणारं सरकार अचानक एवढा मोठा निर्णय
कसं घेऊ शकतं, असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला होता. त्यावरील सुनावणीदरम्यान, सुप्रीम कोर्टानं आधार-पॅन जोडणीच्या निर्णयाला स्थगिती दिली.