हिंगोली जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध संत गजानन महाराज यांची पालखी दाखल झाली आहे.वाशीम जिल्ह्यातील रिसोड मार्गे मराठवाड्यात संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आहे . पानकनेरगाव याठिकाणी वारकऱ्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . शेगाव शहरांमध्ये ही दिंडी मुक्कामी असणार आहे. तर आज वाढोणा फाटा परिसरामध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी या दिंडीचे स्वागत केले. तसेच संत गजानन महाराज हे देशाचे वैभव आहेत असं मत देखील हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी व्यक्त केले आहे.तर शेगाव तालुक्यामध्ये ठिकठिकाणी या संत गजानन महाराज पालखीचे स्वागत करण्यात येत आहे.
श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी संत गजानन महाराजांचा पालखी सोहळ्याचे आयोजन मागील ६० वर्षांपासून केले जात आहे. सुमारे ७५० किलोमीटर अंतर पायी चालून पालखी पंढरपुरात दाखल होते. या पालखी सोहळ्याचे हिंगोली जिल्ह्यातील भाविकांना आकर्षण असते.
मागील साठ वर्षांपेक्षा अधिक काळापासून आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणारी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाले आहे. हि पालखी मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगाव येथे दाखल झाली आहे. शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी गुरुवारी १६ जूनला दाखल झाली आहे.पाऊसाची झड आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे