Palghar: आईचं रागावणं मनाला लागलं अन् तरुणाने गाठलं मोरवणे धरण; पालघरमधील घटनेने परिसर हादरला

पालघरमधील मोरवणे धरणात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Palghar: आईचं रागावणं मनाला लागलं अन् तरुणाने गाठलं मोरवणे धरण; पालघरमधील घटनेने परिसर हादरला

पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने रागावल्याचं मनाला लावून घेत एका तरुणाने धरणात उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.यज्ञेश प्रमोद सांबरे असे मृत तरुणाचे नाव असून तो नारोडा परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. गुरुवारी सकाळी मोरवणे धरणामध्ये एका तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ याची माहिती सफाळे पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.

तपासादरम्यान मृत तरुणाची ओळख यज्ञेश सांबरे अशी पटली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवत पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत घरातील किरकोळ कारणावरून आईने रागावल्याने यज्ञेश मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे.रागाच्या भरात तो घरातून बाहेर पडला आणि थेट मोरवणे धरण गाठल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्याने धरणात उडी घेत आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात शोककळा पसरली आहे.दरम्यान, ही आत्महत्या केवळ घरगुती वादातून झाली की यामागे आणखी काही कारण होते, याचाही शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी सफाळे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number