इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ल्याची मोडतोड करुन सुरु केले रिसॉर्ट

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर   पालघर जिल्ह्यात लहान मोठे अनेक किल्ले आहेत . त्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणजे तारापुर येथील समुद्रालगत  असलेला तारापूर किल्ला. पोर्तुगीज काळात या किल्ल्याचा व्यापारउदीमासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. याच किल्ल्यातुन लाकूड, तांदूळ यांचा साठा गलबतांमार्फत इतरत्र पाठविल्या जात असत. मात्र, साडेसहा एकरवर उभ्या असलेल्या या किल्ल्यापैकी साडेपाच एकर […]

इतिहासाचा साक्षीदार असलेल्या किल्ल्याची मोडतोड करुन सुरु केले रिसॉर्ट

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघर जिल्ह्यात लहान मोठे अनेक किल्ले आहेत . त्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणजे तारापुर येथील समुद्रालगत  असलेला तारापूर किल्ला. पोर्तुगीज काळात या किल्ल्याचा व्यापारउदीमासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. याच किल्ल्यातुन लाकूड, तांदूळ यांचा साठा गलबतांमार्फत इतरत्र पाठविल्या जात असत. मात्र, साडेसहा एकरवर उभ्या असलेल्या या किल्ल्यापैकी साडेपाच एकर जागेवर चोरघे यांच कुळ लागल्याने गावकरी संतप्त झालेयत.

 

इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या किल्ल्यात चोरघे यांनी रिसॉर्ट सुरू केलंय. हे रिसॉर्ट सुरू करताना तीन महिन्यांपूर्वी चोरघे यांनी या किल्ल्याची अनेक ठिकाणी मोडतोड केली. त्यामुळे येथील अनेक पुरातन वस्तु नामशेष झाल्याचा आरोप तारापूरच्या ग्रामस्थांनी केलाय.

एका बाजूला आपल्या गौरवशाली इतिहासाच्या स्मृती चिरकाल रहाव्यात म्हणून कोट्यवधी रुपये खर्चून स्मारके बांधली जात असली तरी दुसऱ्या बाजूला याच गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार ठरलेल्या गडकिल्ल्यांकड़े मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष  होतंय. हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number