जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
मुंबई-अहमदाबाद रेल्वे मार्गावर रूळ तुटल्याची घटना सकाळी घडली. यामुळं कुठलाही अपघात झाला नसला तरी गुजरातहून मुंबईला येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली.
या मार्गावरील गाड्या उशिरानं धावत असल्यामुळं मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना त्रासाला सामोर जावं लागतंय.
संजान आणि उंबरगाव स्थानकादरम्यान सुमारास ही घटना घडलीये. रेल्वे रूळाला तडा गेल्याचं कळताच या मार्गावरील रेल्वेसेवा थांबविण्यात आली.
गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या दुसऱ्या मार्गावरून वळविण्यात आल्या. रूळ तुटल्यानं रेल्वे वाहतूक धीम्या गतीनं सुरू असून प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागल.