जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
राज्य सरकार आणि आरोग्ययंत्रणा कुपोषणाच्या उच्चाटनासाठी पालघर जिल्ह्यात राज्यात सक्षमपणे काम करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये तीव्र आणि अतितीव्र कुपोषणग्रस्त मुलांच्या संख्येंत वाढ झाल्याचं टास्क फोर्सच्या अहवालात उघड झालं.
त्यामुळे सरकारी यंत्रणा गरीब जनतेपर्यंत पोहचत नसल्याचं दिसून येत आहे. कुपोषित बालकांच्या वाढत्या प्रमाणावर आळा बसवायचा असेल तर गर्भवतींच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मातेला योग्य आहार मिळाला तर गर्भाची योग्य वाढ होईल आणि कुपोषित बालकांच्या संख्येत घट होईल.