जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर राहणारे आदिवासी पाउस पडला की शेतात काम करणारे उन आलं की विटभट्टीवर काम करून आपल्या लेकरांना शाळेत
घालणारे.
जमीनजुमला नसल्याने मजूरीवरच पोट. म्हणून सरकारी योजनेतून चालणा-या आंगणवाडीत लहान मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. तिथं त्यांना सरकार अन्नं
पुरवतं. कारण मुलांचं कुपोषण होउ नये म्हणून. पण कसं असतं हे अन्न तुम्ही ऐकले तर तुमचाही संताप होईल.
गेल्या महिन्यात शेवया आल्या. पाकीट उघडलं की दिसल्या बुरशी लागलेल्या शेवया, कच्च्या शेवया, जाड शेवया, कडक शेवया.
टीएचआर योजनेतून आलेले हे पॅकेट फेकून द्यावे लागतात किंवा जनावरांना खायला घालण्याची वेळ येते. कारण लहान मुलं ते खाऊच शकत नाहीत.
शिरा, रवा, सतूचं पीठ असा आहार या मुलांना मिळतो. आहार कसला ते बारीक पीठच असतं. जे खाण्या लायक नाही.
ज्याकडे जनावरंही ढुंकूण पाहत नाहीत, तसं अन्न खाण्याची वेळ येत असल्याची व्यथा आदिवासींनी व्यक्त केली आहे. आणि सरकार म्हणतं हे पौष्टिक अन्न तुम्ही
मुलांना द्या.
टीएचआर गेली अनेक वर्ष पुरवला जातोय. बिलावर बिलं काढली जातायत. ती पासही होतात. टीएचआरच्या माध्यमातून आदिवासींवर उपकार केल्याची भाषा नेते,
अधिकारी करतात.
बजेटची तरतूद संपली की, पुन्हा टेंडरची तयारी करतात. मात्र, आदिवासींच्या मुलांच्या पौष्टिक आहाराच्या गुणवत्तेत मात्र काडीमात्र फरक पडत नाही.