पालघरमध्ये मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर   पालघरमध्ये आज मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. 14 ऑगस्ट 1942 साली ब्रिटिश राजवटी विरोधात ‘चले जावो’चा नारा देत पालघरमधील अनेक तरुण रस्त्यावर उतरले होते.   या मिरवणुकीत सुमारे 5 हजारहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता. गेल्या 75 वर्षापासून 14 ऑगस्टला हा हुतात्मा दिन पालघरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात […]

पालघरमध्ये मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा

जय महाराष्ट्र न्यूज, पालघर

 

पालघरमध्ये आज मोठ्या उत्साहात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. 14 ऑगस्ट 1942 साली ब्रिटिश राजवटी विरोधात ‘चले जावो’चा नारा देत पालघरमधील अनेक तरुण रस्त्यावर उतरले होते.

 

या मिरवणुकीत सुमारे 5 हजारहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला होता. गेल्या 75 वर्षापासून 14 ऑगस्टला हा हुतात्मा दिन पालघरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.

 

यादिवशी मूक मिरवणुकीनं शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी असतात. तसंच यादिवशी पालघर शहरातील संपूर्ण बाजारपेठही बंद ठेवण्यात येते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number