जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पैसे आणि दागिने चोरीच्या अनेक घटना ऐकण्यास येतात.माञ एसटी महामंडळाची बस चक्क पळवून नेल्याचं समोर आलयं.पुण्यात संतोष माने या माथेफिरु एसटी ड्रायव्हरनं घातलेल्या हौदोसानंतर माथेफिरुची आणखी एक घटना ऐकण्यास मिळाली. पालघरमधल्या बोईसर बस आगारातून एसटी महामंडळाची बस पळवल्याची घटना घडलीये. बस पळवणारा माथेफिरू असल्याने त्याने हे कृत्य केल्याचं समजतयं.
सुदैवाने ती बस झाडाला धडकल्याने ह्या माथेफिरूला ताब्यात घेण्यात यश आले. तरी माञ हा निष्काळजीपणा अनेकांच्या जिवावर बेतला असता आणि पुण्याच्या संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असती.यावेळी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांनी माथेफिरूला चोप देत बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिलं.