जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
शत्रूनी करनी केल्याचं सांगत तरुणीचं काळीज मागणाऱ्या 3 भोंदू बाबांना पोलिसांनी अटक केली. ही धक्कादायक घटना पालघरच्या वाणगावमधील खंबाळे येथे घडली.
देवनाथ मदारी, विजयनाथ मदारी आणि प्रभुनाथ मदारी अशी या भोंदू बाबांची नावं आहेत. या तिन्ही भोंदू बाबा गुजरातच्या हिमतनगर मधील असल्याची माहिती समोर आली आहे.
दुकानदार संजय पऱ्हाड यांच्या व्यवसायात वाढ होत नसल्याचं कारण या भोंदू बाबांनी शत्रूनं करनी केल्याचं सांगितलं. यासाठी पूजा करावी लागणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
या भोंदू बाबानं सांगितल्याप्रमाणे पूजेचं सामान आणि 5 रुपयांच्या, 2 हजार रुपयांच्या नोटा, नारळ पूजेसाठी आणण्यात आले. पूजा झाल्यानंतर भोंदू बाबांनी पूजा अपूर्ण असल्याचं सांगितलं.
पूजेसाठी एका तरुणीचं काळीज लागणार असल्याचं भोंदू बाबांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही काळीज देतो 5 लाख रुपये द्या अशी मागणी या भोंदू बाबांनी केली.
यासंपूर्ण प्रकारानंतर पऱ्हाड करांनी पोलिसांत धाव घेतली आणि त्यानंतर सापळा रचून या तिन्ही भोंदू बाबाला अटक करण्यात आली.