‘पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!’ राखी सावंतचा Video पाहून भारतीयांचा संताप

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात असंतोष उफाळून आला असताना, राखी सावंतने ‘जय पाकिस्तान!’ असं म्हणत पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतली.

‘पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!’ राखी सावंतचा Video पाहून भारतीयांचा संताप

मुंबई: विवादांमध्ये राहणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, पण यावेळी तिचा मुद्दा अधिक गंभीर आणि संतापजनक ठरत आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानविरोधात असंतोष उफाळून आला असताना, राखी सावंतने ‘जय पाकिस्तान!’ असं म्हणत पाकिस्तानची उघडपणे बाजू घेतली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून त्यात ती म्हणते, 'मी राखी सावंत आहे. मी खरं बोलेन, खऱ्याशिवाय काही बोलणार नाही. पाकिस्तानवाल्यांनो, मी तुमच्या सोबत आहे. जय पाकिस्तान!' यामुळे भारतीय नागरिक चांगलेच संतप्त झाले असून तिने केलेल्या वक्तव्यावरून तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच स्तरांवरून केंद्र सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर राखी सावंतने पाकिस्तानला पाठीशी घालणारे विधान करून देशवासीयांचा रोष ओढवून घेतला आहे. तिच्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकऱ्यांनी तिचं नागरिकत्व रद्द करावं, तिला देशाबाहेर हाकलावं आणि तिच्यावर देशद्रोहाची कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सुरु केली आहे. 

राखी सावंतचं पाकिस्तानप्रेम याआधीही चर्चेत आलं होतं. काही महिन्यांपूर्वी तिने पाकिस्तानी नागरिक डोडी खानसोबत लग्न करत असल्याचं सांगितलं होतं. तिने भारत-पाकिस्तानमधील नातेसंबंध सुधारण्यासाठी हे पाऊल उचलल्याचंही सांगितलं होतं. लग्नानंतर ती दुबईत स्थायिक होणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र नंतर त्यांचं नातं टिकाव धरू शकलं नाही. राखीच्या वागणुकीवरून अनेकांनी ती केवळ प्रसिद्धीसाठी वादग्रस्त विधानं करत असल्याची टीका केली असली, तरी ‘जय पाकिस्तान’ म्हणणं हे देशद्रोहाच्या सीमारेषेवर पोहोचले आहे, असं म्हणत नागरिक संताप व्यक्त करत आहेत. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number