Pakistani Cosmetics: संगमनेरमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधन उत्पादनांची विक्री, पोलिसांची कडक कारवाई

आवश्यक परवानगीशिवाय ही उत्पादने विक्रीस ठेवल्याचा आरोप असून, त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Pakistani Cosmetics: संगमनेरमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधन उत्पादनांची विक्री, पोलिसांची कडक कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे  पोलिसांनी केलेल्या धाडीत पाकिस्ताननिर्मित सौंदर्यप्रसाधनांचा साठा उघडकीस आला आहे. गोल्डन मार्केटमधील एका दुकानातून ‘गोरी ब्युटी क्रीम’ तसेच ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ या उत्पादनांचा सुमारे १४ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

या कारवाईनंतर संबंधित दुकानदार शाहीद रियाज शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आवश्यक परवानगीशिवाय ही उत्पादने विक्रीस ठेवल्याचा आरोप असून, त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या क्रीम पाकिस्तानमध्ये तयार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही उत्पादने स्थानिक बाजारपेठेत कशी पोहोचली, त्यांचा पुरवठा कोणी केला आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे बेकायदेशीररित्या विक्री होणाऱ्या विदेशी उत्पादनांवर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी काळात अशा प्रकारच्या विक्रेत्यांविरोधात आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number