महाराष्ट्रात शॉर्ट टर्म व्हिसावर असलेल्या 55 पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर

महाराष्ट्रात सध्या 55 पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आहेत. केंद्र सरकारने त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले असून, पोलीस यंत्रणा कारवाईत व्यस्त आहेत.

महाराष्ट्रात शॉर्ट टर्म व्हिसावर असलेल्या 55 पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर

मुंबई : महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये अल्पकालीन (शॉर्ट टर्म) व्हिसावर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली आहे. विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात एकूण 55 पाकिस्तानी नागरिक आहेत. केंद्र सरकारने त्यांना भारत सोडण्याचे आदेश दिले असून, त्यानुसार संबंधित यंत्रणा कारवाई करत आहेत.

राज्यात सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक ठाणे आणि नागपूर या ठिकाणी वास्तव्यास आहेत. ठाण्यात 19 आणि नागपूरमध्ये 18 पाकिस्तानी नागरिक सध्या अल्पकालीन व्हिसावर राहत आहेत. याशिवाय, जळगाव जिल्ह्यात 12, पुणे शहरात 3, तर मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमध्ये प्रत्येकी 1-1 पाकिस्तानी नागरिकाची नोंद आहे.

याप्रकरणी गृह विभागाकडून सतत देखरेख ठेवली जात आहे. संबंधित नागरिकांनी व्हिसाच्या कालावधीत भारत सोडले नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारने देशभरातील शॉर्ट टर्म व्हिसावर असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा आढावा घेऊन तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रातील स्थानिक पोलीस प्रशासनही खबरदारी घेत आहे.

विशेष म्हणजे, शॉर्ट टर्म व्हिसावर भारतात आलेले हे नागरिक प्रामुख्याने कौटुंबिक भेटी, वैद्यकीय उपचार अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी भारतात दाखल झाले होते. मात्र, काही जणांनी व्हिसाचा कालावधी संपल्यानंतरही परतण्यास विलंब केला आहे. त्यामुळे यंत्रणांचे लक्ष अधिक बधिर झाले आहे.

राज्यातील पाकिस्तानी नागरिकांची विभागानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे :

ठाणे : 19
नागपूर : 18
जळगाव : 12
पुणे शहर : 3
मुंबई : 1
नवी मुंबई : 1
रायगड : 1

हेही वाचा :दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात: पिकअपने 11 जणांना चिरडले 7 मृत्युमुखी

माहिती मिळाल्यानंतर ठिकठिकाणी संबंधित नागरिकांच्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे. पोलीस आणि विशेष शाखा यांच्यात समन्वय ठेवून पुढील कारवाई केली जात आहे.

भारत सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सर्व पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचा उद्देश भारताची अंतर्गत सुरक्षा मजबूत राखणे आणि व्हिसा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करणे असा आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number