वृत्तसंस्था, नवी दिल्ली
या जगात निरनिराळ्या तऱ्हेचे लोकं पहायला मिळतात. मात्र, पाकिस्तानात एक व्यक्ती असा आहे जो फक्त झाडांची पानं खाऊन जगतो.
महमूद बट असं या व्यक्तीचं नाव असून ते पाकिस्तानातील पंजाब प्रांतात राहतात. सर्वात आश्चर्य म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून महमूद हे झाडांची पानं आणि फांद्या खाऊनच जगतात.
पण, कधीही ते आजारी पडले नाहीत. अत्यंत गरीबीमुळे त्यांच्यावर ही वेळ ओढवली.
गुजरावाला जिल्ह्यात राहणाऱ्या महमूद यांच्याकडे कोणतंही काम नसल्याने आणि खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने त्यांनी झाडांची पानं खायला सुरुवात केली.
रस्त्यावर भीक मागण्यापेक्षा झाडांची पानं तोडून खाण्यातच त्यांना समाधान वाटतं. मात्र, आता महमूद यांच्याकडे कामही आहे आणि खाण्यासाठी पैसेही. तरीही त्यांची पानं खाण्याची सवय काही सुटलेली नाही.