पाक भारतासमोर झुकला

पाकिस्तान भारतासमोर झुकला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची याचना करतो आहे. दहशतवादी कारवाया आणि कुरापती करणारा आजपर्यंत सीमेवरील शांतता बिघडवण्याचे उद्योग करणारे आणि शांततामय चर्चेत खोड्या घालणारा पाकिस्तान काहीसा नरमला आहे. आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या पाकिस्तानने मंगळवारी भारताशी चर्चेची तयारी दाखवली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी चर्चेसाठी गंभीर आणि प्रामाणिक प्रयत्न व्हावेत […]

पाक भारतासमोर झुकला

पाकिस्तान भारतासमोर झुकला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची याचना करतो आहे. दहशतवादी कारवाया आणि कुरापती करणारा आजपर्यंत सीमेवरील शांतता बिघडवण्याचे उद्योग करणारे आणि शांततामय चर्चेत खोड्या घालणारा पाकिस्तान काहीसा नरमला आहे. आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या पाकिस्तानने मंगळवारी भारताशी चर्चेची तयारी दाखवली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी चर्चेसाठी गंभीर आणि प्रामाणिक प्रयत्न व्हावेत अशी विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

मात्र त्याच वेळी मध्यस्थ देशाचा हेका कायम राखत संयुक्त अरब अमिरात ही चर्चा पुन्हा सुरु होण्यात महत्वाची भूमिका पार पाडू शकतो असेही म्हटले आहे. दुबईतील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरीफ यांनी चर्चेचा सूर आवळला आहे. पुन्हा एकदा चर्चेची सुरुवात व्हावी हा माझा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश आहे. दोन्ही देशांदरम्यानचे काश्मीरसारखे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर आणि प्रामाणिक चर्चेची आवश्यकता आहे. असे शरीफ यांनी म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान शेजारी देश आहेत आणि एकमेकांसोबतच जगायचे आहेत. मग शांततेने प्रगती साधायची की भांडण करून वेळ आणि स्रोत व्हाया घालवायचे याचा निर्णय आम्हा दोन देशांना घ्यावा लागणार आहे.

आम्ही तीन लढाया लढलो. पण यातून दोन्ही देशांच्या नागरिकांना गरिबी, दैना आणि बेरोजगारीचा मिळाली असे शरीफ म्हणतात. आम्ही धडा शिकलो आहोत आणि शांततापूर्ण वातावरणातच आम्हाला आमाच्या मूळ प्रश्नावर मात करता येईल. आम्हाला गरिबी हटवून समृद्धी आणायची आहे. नागरिकांना शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगार द्यायचा आहे. बॉम्ब आणि शास्त्रांवर तिजोरी रिकामी करायची नाही हा संदेश मला मोदी यांना द्यायचा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number