‘पद्मावत’ चे तिकीट दीड हजार रुपये; पुण्यातले शो हाऊसफुल्ल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   बहुचर्चित पद्मावत चित्रपट आज प्रदर्शित झालाय. पुण्यात या चित्रपटाचे सकाळचे शो हाऊसफुल्ल झालेत. मोठ्या पोलीस बंदोबस्तात पद्मावत प्रदर्शित झालाय. चित्रपटाच्या बुकींगलाही प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. पद्मावत’ सिनेमाची बंदी पाहता सगळ्यामध्येच याची उत्सुकता आहे. पण, हा सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला खिसा नक्कीच रिकामा करावा लागेल. मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह […]

‘पद्मावत’ चे तिकीट दीड हजार रुपये; पुण्यातले शो हाऊसफुल्ल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बहुचर्चित पद्मावत चित्रपट आज प्रदर्शित झालाय. पुण्यात या चित्रपटाचे सकाळचे शो हाऊसफुल्ल झालेत. मोठ्या पोलीस बंदोबस्तात पद्मावत प्रदर्शित झालाय. चित्रपटाच्या बुकींगलाही प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.

पद्मावत’ सिनेमाची बंदी पाहता सगळ्यामध्येच याची उत्सुकता आहे. पण, हा सिनेमा पाहायचा असेल तर तुम्हाला खिसा नक्कीच रिकामा करावा लागेल.

मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह सर्वच शहरात तिकीट हजाराच्या वर आहे. इतकं असूनही ऑनलाईन तिकीटाची विक्री देखील काही कमी नाही. विशेष म्हणजे सगळी तिकीटांची विक्री झाली असून थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत.

 

देशभरातील थिएटरमधील ‘पद्मावत’चे दर 

मुंबई – पीव्हीआर वर्सोवा – 1030 रुपये

मुंबई – आयनॉक्स नरिमन पॉईंट – 1550 रुपये

मुंबई – आयनॉक्स वरळी – 1550 रुपये

ठाणे – सिनोपोलिस व्हिव्हियाना मॉल – 1000 रुपये

पुणे – आयनॉक्स बंड गार्डन – 780 रुपये

नाशिक – सिनेमॅक्स सिटी सेंटर मॉल – 530 रुपये

दिल्ली – डायरेक्टर्स कट अॅम्बियन्स – 2400 रुपये

बंगळुरु – पीव्हीआर सेंट्रल स्पिरीट मॉल – 580 रुपये

हैदराबाद – बीव्हीके मल्टिप्लेक्स – 230 रुपये

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number