वादांच्या कचाट्यात सापडलाय संजय लीला भनसाळींचा ‘पद्मावती ‘

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई संजय लीला भंसाळींचा पद्मावती हा सुरुवातीपासूनच वादाच्या कचाट्यात सापडलाय. 1 डिसेंबरला प्रदर्षित होणाऱ्या चित्रपटाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कधी चित्रपटाचा सेट जाळला जातो, तर कधी चित्रपटसंदर्भातील रांगोळी विस्कळीत करण्यात येते. या सर्व प्रकारानंतर आता पद्मावती चित्रपटाच्या वादात राजस्थान सरकार हस्तक्षेप करणार आहे. चित्रपटात नेमकं काय चुकीचं आहे, हे पाहण्यासाठी […]

वादांच्या कचाट्यात सापडलाय संजय लीला भनसाळींचा ‘पद्मावती ‘

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

संजय लीला भंसाळींचा पद्मावती हा सुरुवातीपासूनच वादाच्या कचाट्यात सापडलाय. 1 डिसेंबरला प्रदर्षित होणाऱ्या चित्रपटाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कधी चित्रपटाचा सेट जाळला जातो, तर कधी चित्रपटसंदर्भातील रांगोळी विस्कळीत करण्यात येते. या सर्व प्रकारानंतर आता पद्मावती चित्रपटाच्या वादात राजस्थान सरकार हस्तक्षेप करणार आहे. चित्रपटात नेमकं काय चुकीचं आहे, हे पाहण्यासाठी राजस्थान सरकारनं समिती स्थापन केली आहे.

ही समिती चित्रपट पाहणार, त्यातील वाद जाणून घेणार आणि त्यानंतर प्रदर्शनाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाला सुरुवातीपासूनच विरोध होतोय. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यावर सुनावणीस नकार दिला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number