“पद्मावत”विरोधात करणी सेनेबरोबरच आता मराठा, ब्राम्हण आणि मुस्लीम संघटनाही आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेबरोबरच आता मराठा, ब्राम्हण आणि मुस्लीम संघटनाही आक्रमक झाल्यात. 25 जानेवारी रोजी औरंगाबादसह मराठवाड्यात चित्रपट रिलीज होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका करणी सेना, मराठा, ब्राम्हण आणि मुस्लीम संघटनांनी मांडलीये. यासाठी जवळपास 11 पेक्षा जास्त संघटनांच्या प्रतिनिधीनी औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेत. जर, औरंगाबाद […]

“पद्मावत”विरोधात करणी सेनेबरोबरच आता मराठा, ब्राम्हण आणि मुस्लीम संघटनाही आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

पद्मावत चित्रपटाविरोधात करणी सेनेबरोबरच आता मराठा, ब्राम्हण आणि मुस्लीम संघटनाही आक्रमक झाल्यात. 25 जानेवारी रोजी औरंगाबादसह मराठवाड्यात चित्रपट रिलीज होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका करणी सेना, मराठा, ब्राम्हण आणि मुस्लीम संघटनांनी मांडलीये.

यासाठी जवळपास 11 पेक्षा जास्त संघटनांच्या प्रतिनिधीनी औरंगाबादचे विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेत. जर, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील कोणत्याही ठिकाणी पद्मावत रिलीज झाला तर या संघटना आणखी आक्रमक होतील.

त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर करणी सेना जबाबदार नसेल. त्यामुळे चित्रपट दाखवू नये असा इशारा त्यांनी दिलाय. अशातच पद्मावतविरोधातील राडा मराठवाड्यातही धुमसू लागलाय असं चित्र स्पष्ट होताना दिसतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number