‘अनुराग ठाकूर, तुम्ही किती लोकांना गोळी घालाल तुम्ही कितीही गोळी घाला पण आम्ही मरणार नाही. 1993 ला याच मुंबईत रक्ताची होळी खेळली गेली मात्र न्याय मिळाला नाही.’, असं वक्तव्य MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर सभेत केलं आहे. CAA ला विरोध करणाऱ्यांना देशद्रोही संबोधत त्यांना गोळ्या घालण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं होतं. त्याला ओवैसी यांनी उत्तर देताना ‘सांगाल तेथे येतो, घाला मला गोळ्या’ असं आव्हान दिलंय.
अनुराग ठाकूर, तुम्ही सांगाल तेथे यायला मी तयार आहे. मला गोळ्या घाला.
मी मुस्लिम आहे. जो पर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत मी मुस्लिमच आहे आणि तो पर्यंत या देशातीलच आहे.
कोणीही आमचं देशावरच प्रेम हिरावून घेऊ शकत नाही
युसूफ मेहेर अली यांनी Quit India चा नारा दिला होता ‘Quit BJP’ चा नारा आपल्याला द्यायचा आहे.
CAA संदर्भात बोलताना त्यांनी आजपर्यंतच्या इतिहासात असा काळा कायदा कोणीही आणला नाही, असं ओवैसी म्हणाली.
विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी सोमवारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर एका सभेत सहभागी झाले होते.
त्यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात निदर्शनं करणाऱ्यांना ते ‘गद्दार’ म्हणाले होते..
त्यांनी ‘देश के गद्दारों को…’ अशी अर्धवट घोषणा दिली, तेव्हा सभेला उपस्थित असणाऱ्यांनी ‘गोली मारो’ असं म्हणत घोषणा पूर्ण केली.
त्या घोषणेवरून वाद निर्माण झाला आहे. हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.