‘आमचे आदर्शच अपमानित होत असतील, तिथे जायचे का?’ – देवेंद्र फडणवीस

९४व्या अखिल भारतीय मराठी मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाबाबत खळबळजनक ट्विट केले आहे. ते म्हणाले, ‘जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील तिथे जायचं का?’ असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले आदर्श आहेत. […]

‘आमचे आदर्शच अपमानित होत असतील, तिथे जायचे का?’ – देवेंद्र फडणवीस

९४व्या अखिल भारतीय मराठी मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनाबाबत खळबळजनक ट्विट केले आहे. ते म्हणाले, ‘जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील तिथे जायचं का?’ असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले आदर्श आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व प्रत्येकाच्या मनात रोवलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव न दिल्याने फडणवीस नाराज झाल्याचे दिसत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जागी कुसुमाग्रजांचे नाव दिल्याचा आक्षेप फडणवीसांनी केला आहे. त्यामुळे जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर तिथे जायचंच का? असे फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमीसुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ.भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदसुद्धा त्यांनी भूषविलेले आहे. असे तिन्ही बहुमान मिळालेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे कादाचित एकमेव आहेत.

परंतु, या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचेही मी स्वागतच करत असल्याचे फडणवीस म्हणाले. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number