जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद
उस्मानाबादमध्ये शेतकऱ्यांची सरकरानं थट्टा मांडलीय की काय असाच प्रश्न विचारला जातोय.
गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करताना त्यांच्या हातात आरोपीसारख्या पाट्या दिल्या. उमरग्याच्या शिवारात हा प्रकार घडलाय.
त्यामुळे हे आरोपी आहेत की शेतकरी असाच प्रश्न आता विचारला जातोय.
पंचनामा करताना शेतकऱ्यांना दिलेल्या या विचीत्र वागणूकीबद्दल संताप व्यक्त केला जातोय. महसूल विभागाने अशा प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा केली आहे.