पुण्यात जी-२० परिषदेचे आयोजन

जी २० देशांतील उद्याचे नेतृत्व करणाऱ्या शहरांना सर्वतोपरी स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने विचारमंथन आणि कृती करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सोमवारपासून जी-२० परिषदेला सुरुवात झालीआहे. भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस होणाऱ्या या बैठकीत २० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. तसेच जागतिक बॅंक, एशियन बॅंकेच्याही प्रतिनिधींचा त्यात समावेश असेल. केंद्रीय अवजड […]

पुण्यात जी-२० परिषदेचे आयोजन

जी २० देशांतील उद्याचे नेतृत्व करणाऱ्या शहरांना सर्वतोपरी स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने विचारमंथन आणि कृती करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सोमवारपासून जी-२० परिषदेला सुरुवात झालीआहे. भारतासह ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल यांच्यातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस होणाऱ्या या बैठकीत २० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले. तसेच जागतिक बॅंक, एशियन बॅंकेच्याही प्रतिनिधींचा त्यात समावेश असेल. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत बैठकीला प्रारंभ होईल. पायाभूत सुविधांसाठीचा जाहिरनामा या बैठकीत तयार होईल.

यंदाच्या जी २० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. त्यामुळे परिषदेच्या बैठका देशात होत आहे. त्यातील पायाभूत सुविधांची बैठक शहरातील सेनापती बापट रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये होणार आहे. बैठकीत शहरांचा विकास ते शाश्वत जीवनशैली असे एकूण सात सत्र होतील, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सहसचिव सोलोमोन अरोकियाराज यांनी पत्रकार परिषदेत रविवारी दिली. मंगळवारी बैठकीचा समारोप होईल.

देशातील शहरांचा विकास कसा करता येईल, शहरीकरणामुळे झालेल्या समस्यांवर उपाययोजना शोधणे, शहरे विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरून निधी जमा करणे, शाश्वत जीवनशैलीकडे आदी विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे. उदघाटनानंतर जगभरातील पायाभूत सुविधा, वाढते शहरीकरण आणि त्या समोरची आव्हाने यावर चर्चा होईल. दुपारी १ ते ३ दरम्यान ‘शहरीकरण’ या विषयावर परिसंवाद होईल.

त्यानंतर दुपारी ४ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सावित्रीबाई फुले विद्यापीठात जगभरातून आलेल्या पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारतीय लोककला, लोकसंगीत व लावणी असे कार्यक्रम करून मराठी संस्कृतीची ओळख करून दिली जाणार असल्याचे अरोकियाराज यांनी सांगितले. यावेळी पीआयबीच्या संचालिका मोनीदिया मुखर्जी उपस्थित होत्या.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number