मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कालपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. पावसाच्या सरी कोसळत असतानाच, येत्या चार-पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने शनिवारी दिला होता. लोकांनी आपल्या सुरक्षेबाबत जागरुक राहावे. हवामान खात्याने रविवारी महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने रायगड आणि रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट तर पालघर, मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये जोरदार आणि मुसळधार पाऊस पडू शकतो.
मान्सून पहिल्यांदा केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रात दाखल होतो. देशात दक्षिण भागात पहिल्यांदा पाऊस होतो. त्यानंतर दक्षिण-पश्चिम भागातून मान्सून पाऊस पुढे सरकतो. तिथून पुढे सरकल्यानंतर संपूर्ण देशात पाऊस सुरु होतो. देशातील काही राज्यातील इतर मागच्या पावसाळ्याची तुलना केल्यानंतर तिथली पावसाची गती कमी झाली आहे. मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, कश्मीर आणि लडाख, चंडीगढ आणि दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्ये मान्सून पुढे सरकण्यास सध्या परिस्थिती अनुकूल झाली आहे. पुढच्या 48 तासात गुजरात, राजस्थान आणि पंजाब राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढच्या आठवड्यात हा पाऊस असाचं सुरु राहणार आहे. काल दिल्लीतलं तापमान 37.2 डिग्री सेल्सियस होतं. पाऊस पडल्यानंतर तिथलं तापमान खाली गेलं आहे. सध्या तिथं 30.4 डिग्री सेल्सियस तापमान दाखवत आहे. हवामान खात्याकडून पुढच्या सहा दिवसांसाठी उत्तर पश्चिम भारतात येलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर पुढच्या आठवड्यात तापमान कमी आणि जास्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या नाशिक, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढच्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.