अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांना न्यायालयाचा दिलासा मिळालेला नाही. ऋषिकेश देशमुख यांच्या अटक पूर्व जामिनाला विरोध करत त्याप्रकरणी पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.
१०० कोटी आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ऋषिकेश देशमुख यांना ईडीने नोटीस बजावली होती. ईडीने चौकशीसाठी ऋषिकेश देशमुख यांना हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ते ईडी चौकशीला हजर न राहता त्यांनी न्यायालयाचे दार वाजवले. ऋषिकेश देशमुख यांनी न्यायलयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांना दिलासा न देता याप्रकरणी पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी होणार आहे.
ऋषिकेश देशमुख यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने ऋषिकेश देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. येत्या ४ डिसेंबर रोजी ऋषिकेश देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होणार आहे.