विधानभवनाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचे आंदोलन

आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आणि सलग तिसर्या दिवशीही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी प्रकरण या दोन मुद्द्यांवरून भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचारी संप, शेतकऱ्यांची वीज तोडणी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे विधानभवनात […]

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांचे आंदोलन

आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. आणि सलग तिसर्या दिवशीही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी प्रकरण या दोन मुद्द्यांवरून भाजपकडून घोषणाबाजी करण्यात आली.

राज्यातील ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचारी संप, शेतकऱ्यांची वीज तोडणी या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. तर सरकारने शेतकऱ्यांची वीज पुरवठा बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. यामध्ये आंदोलनामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संजय केळकर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांचा सहभाग  होता.

हिवाळ अधिवेशनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. राज्यातील विविध मुद्द्यांसाठी आणि विविध मागणीसाठी भाजप नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले. तर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर आजही तिसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number