मुख्यमंत्र्यांची चतुर खेळी ; विरोधकांनी केला पळपुटेपणाचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभा अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडत विरोधकांवर कुरघोडी केली आहे. कारण काही दिवसांपूर्वी विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. या अविश्वास ठरावावर अद्याप चर्चाही झाली नव्हती. अशातच मुख्यमंत्र्यांनी अचानक विश्वासदर्शक ठराव मांडत विरोधकांना धक्का दिला. दरम्यान, विरोधी पक्षांनी सरकारच्या या कृतीवर जोरदार टीका केलीय. ‘अविश्वास ठरावावर […]

मुख्यमंत्र्यांची चतुर खेळी ; विरोधकांनी केला पळपुटेपणाचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभा अध्यक्षांवर विश्वासदर्शक ठराव मांडत विरोधकांवर कुरघोडी केली आहे. कारण काही दिवसांपूर्वी विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. या अविश्वास ठरावावर अद्याप चर्चाही झाली नव्हती. अशातच मुख्यमंत्र्यांनी अचानक विश्वासदर्शक ठराव मांडत विरोधकांना धक्का दिला.

दरम्यान, विरोधी पक्षांनी सरकारच्या या कृतीवर जोरदार टीका केलीय. ‘अविश्वास ठरावावर चर्चा न करून सरकारने पळपुटेपणा केला आहे’ असे म्हणत अजित पवारांनी सरकारचा समाचार घेतला आहे.

विधानसभेचे कामकाज चालू असतानाच मुख्यमंत्री बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी मुख्यमंत्री काय बोलतील याचा विरोधकांना काहीच अंदाज नव्हता. अशातच मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला. या गदारोळातच एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले आणि आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजुर करण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number