देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरस्काराच्या निमित्ताने आज १ ऑगस्ट रोजी पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान मोदी १ ऑगस्टला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात दाखल झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काळे झेंडे घेऊन विरोधकांकडून पुण्यातील मंडई परिसरात आंदोलन करण्यात आले. पुण्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, रमेश बावगे, मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे नेते कार्यकर्ते उपस्थित आहेत. पोलिसांनी काही विरोधकांना ताब्यात घेतलं आहे.