फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सेल, ओप्पोचा जबरदस्त F7 स्मार्टफोन लवकरच होणार लॉंन्च

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई ओप्पो कंपनी आपला ‘F7’ स्मार्टफोन लवकरचं बाजारात आणणार आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य त्याचा 25 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ओप्पोने ‘F7’ स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसाठी विशेष तयारी केली असून कंपनी अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचं प्रोमोशन करत आहे. 26 मार्च रोजी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ‘ओप्पो F7’ स्मार्टफोन लॉन्च केला […]

फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सेल, ओप्पोचा जबरदस्त F7 स्मार्टफोन लवकरच होणार लॉंन्च

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ओप्पो कंपनी आपला ‘F7’ स्मार्टफोन लवकरचं बाजारात आणणार आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य त्याचा 25 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

ओप्पोने ‘F7’ स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसाठी विशेष तयारी केली असून कंपनी अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचं प्रोमोशन करत आहे. 26 मार्च रोजी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ‘ओप्पो F7’ स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोनचा ब्रँड अॅम्बेसिडर, टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या असेल.

या स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत कोणतीच माहिती उघड करण्यात आली नाही. टिझर पाहून जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची 6.2 इंच एचडी स्क्रिन असण्याची शक्यता आहे. स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर किंवा मीडियाटेक हेलियो पी 6 चिपसेट, 4 जीबी किंवा 6 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज इत्यादी फीचर्स असू शकतात. या स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस ब्यूटीफिकेशन टेक्नोलॉजी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या फीचर्सच्या साहाय्याने युजर्सना फोटोसोबत अनेक प्रकारचे प्रयोग करता येतील. तसचं सेल्फीचा बॅकग्राउंन्ड ब्लर करता येऊ शकेल. टीझरवरुन या स्मार्टफोनची आयफोन-एक्सशी तुलना केली जात आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number